केम येथील कुंकू कारखान्याला भेट

केम येथील कुंकू कारखान्याला भेट
Published on

KTR26B09456
केम (ता. करमाळा) ः येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना हिंगोलीचे आमदार हेमंत पाटील, परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील.

केम येथील कुंकू कारखान्यांची आमदार हेमंत पाटलांनी केली पाहणी

केत्तूर, ता. २५ ः केम (ता. करमाळा) येथे कुंकू कारखान्यांची पाहणी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार तथा विधान परिषद आमदार हेमंत पाटील व परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी भेट दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ.अमित कदम, ग्रामसेवक वैभव तळेकर यांच्यासह कुंकू कारखानदार व केम ग्रामस्थ उपस्थित होते.
केम गावाला कुंकू उत्पादनाची ऐतिहासिक ओळख असून, गावात सुमारे २५ कुंकू कारखाने कार्यरत आहेत. या उद्योगातून सुमारे ३०० ते ४०० नागरिकांना रोजगार मिळत आहे. मात्र, रस्त्यांची दुरवस्था, रेल्वेची बंद झालेली पार्सल सुविधा तसेच इतर शासकीय विभागांच्या अटी-शर्तींमुळे उद्योगांच्या विकासाला अडथळे निर्माण होत असल्याचे ग्रामस्थ व कारखानदारांनी निदर्शनास आणून दिले.
या सर्व प्रश्नांची दखल घेत आमदार हेमंत पाटील यांनी केमच्या उद्योग व विकासाशी संबंधित प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून देऊन उपलब्ध सुविधांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कुंकू कारखानदार गोडसे आण्णा, संदेश गोडसे, गोरख खानट, धनंजय सोलापूरे, कृषी सहाय्यक प्रवीण दगडे, प.स. सदस्य बाळासाहेब बिचितकर, संदीप तळेकर, बापू तळेकर, सागर दोंड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com