esakal | बावीस वर्षांपासून राजगडावर वसुबारस साजरा करणारे केशव आरगडे
sakal

बोलून बातमी शोधा

Keshav Argade has been celebrating Vasubaras at Rajgad for the last 22 years2.jpg

केशव आरगडे हे पुणे येथील चिखली परिसरात राहत असून ते हा उपक्रम गेल्या २२ वर्षांपासून अविरतपणे साजरा करत आहेत. याची प्रेरणा त्यांचे वडील प्रभाकर आरगडे यांच्याकडून मिळाली. या प्रेरणेतून त्यांनी महाराष्ट्रातील विविध ३५ किल्ल्यांवर ट्रेक केले आहेत. 

बावीस वर्षांपासून राजगडावर वसुबारस साजरा करणारे केशव आरगडे

sakal_logo
By
मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे (पुणे) : सणवार म्हटलं की, प्रत्येकाला आपल्या घरची ओढ लागते. परंतु गेल्या २२ वर्षांपासून राजगड किल्ल्यावर वसुबारस हा सण एक व्यक्ती  साजरा करत आहे. वर्षातून किमान एक सण तरी महाराजांच्या गडकोटावर साजरा करावा, अशी भावना नुसती मनात न ठेवता ती प्रत्यक्षात उतरवण्याचे काम एक अवलिया व्यक्तिमत्व केशव प्रभाकर आरगडे करीत आहेत.

हे ही वाचा : यावर्षी दिव्यांगाची दिवाळी अंधारातच

केशव आरगडे हे पुणे येथील चिखली परिसरात राहत असून ते हा उपक्रम गेल्या २२ वर्षांपासून अविरतपणे साजरा करत आहेत. याची प्रेरणा त्यांचे वडील प्रभाकर आरगडे यांच्याकडून मिळाली. या प्रेरणेतून त्यांनी महाराष्ट्रातील विविध ३५ किल्ल्यांवर ट्रेक केले आहेत. 

गेली एक वर्षांपासून ते सायकरवर प्रवास करून किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाण्याचे नियोजन करत आहेत. हे करत असताना सामाजिक संदेशांची पाटी ते आपल्या सायकलला व किल्ला चढताना पाठीवर लावून नागरिकांना किल्ल्यावर सण साजरे करावे, जाती पाती मानू नये, पाण्याचे नियोजन करावे, अंधश्रद्धेचे समूळ उचटन करावे, वाहतुकीचे नियम पाळावे, सायकल चालावा, निरोगी राहा असे सामाजिक संदेश देत आहेत. तसेच किल्ल्यावर जाऊन त्या किल्ल्याची साफसफाई करणे, त्याची विल्हेवाट लावणे अशी कामे आरगडे करत आहे.

हे ही वाचा : आशा सेविकांचे मानधनासाठी बारामतीत आंदोलन सुरु

मला ही प्रेरणा वडिलांकडून मिळाली असून महाराष्ट्रतील विविध किल्ल्यांवर फिरत असलो तरी राजगड किल्ल्यावर गेली 22 वर्ष मी वसुबारस साजरी करत आहे. तरी नागरिकांनी आपली संस्कृती जपून  किमान एक तरी सण किल्ल्यांवर साजरा करावा, असे केशव आरगडे म्हणाले. 

संपादन - सुस्मिता वडतिले