पेट्रोल पंपाजवळच कचरा धुमसतोय!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

केशवनगर - मुंढवा परिसरात नागरिकांकडून मोकळी जागा दिसेल तिथे कचरा टाकला जात आहे. हा कचरा इतका अस्तावस्त्य पडलेला असतो की, कचरा वेचणाऱ्यांचे कंबरडे मोडेल, अशी परिस्थिती आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक ठिकाणी तो सर्रास जाळला जात आहे. विशेष म्हणजे मुंढव्यातील पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या जागेत रात्रंदिवस कचऱ्याची आग धुमसत असून,  मोठी दुर्घटना घडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

मुंढवा परिसरात हडपसर रेल्वे स्थानक रस्त्यावर तुलसी हॉल समोरील जागेत, जाधववस्तीवरील मोकळे मैदान, मुंढवा गावठाणातील मारुती मंदिरापाठीमागील बाजूचा नदीपात्रातील परिसर, बधेवस्ती बसथांब्यामागील मोकळे मैदान, रेल्वे उड्डाण पुलाखालील जागेत कायमच कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. हा कचरा सर्रास जाळला जात आहे. 

कचरा जाळला जात असल्याने परिसरात धुराचे लोट पसरून प्रदूषणात भर पडत आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
काही दिवसांपूर्वी जाळलेल्या कचऱ्यामुळे येथील ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती. आता तर पेट्रोलपंपाशेजारीच कचरा जळतोय. 

कचरा जाळणे हा पर्याय राहत नसून यावर ठोस पावले स्वच्छता विभागाने उचलावीत तसेच उड्डाण पुलाखालील कचरा नित्याने उचलावा, अशी मागणी ग्रामस्थ परेश कोद्रे व रवींद्र कांबळे यांनी केली आहे. 

याबाबत स्वच्छता विभागाला लेखी कळविले आहे. जे कर्मचारी कचरा जाळतील, अशांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. कचरा जाळणे हा पर्यायच नाही. नागरिकांनी असे प्रकार कळवावेत.
- दिनेश बेंडे, विभागीय वैद्यकीय अधिकारी  

Web Title: keshavnagar news pune news garbage fire petrol pump