Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

केशवनगर परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चार जणांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. तर, अन्य तिघेजण अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
keshavnagar petrol pump robbery gang arrested mundhwa police
keshavnagar petrol pump robbery gang arrested mundhwa policeSakal

Pune News : केशवनगर परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चार जणांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. तर, अन्य तिघेजण अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

हर्षवर्धन ऊर्फ लकी मोहन रेड्डी (वय १९), कुलदीप ऊर्फ कुणाल संजय साळुंखे (वय १९), तेजस ऊर्फ सनी आश्विन पिल्ले (वय २०), शशांक श्रीकांत नागवेकर (वय २०, सर्वजण रा. केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी चौघांसह इतर तीन साथीदारांविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवनगर परिसरात बुधवारी रात्री पोलिस गस्तीवर होते. त्यावेळी झेड कॉर्नरजवळ काही संशयित तरुण थांबलेले असून, एका पेट्रोल पंपावरील रोकड लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी दिनेश भांदुर्गे यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.

तर, त्यांचे अन्य तीन साथीदार अंधारात पसार झाले. आरोपींकडून कोयता, तलवार, लोखंडी रॉड, मिरची पूड जप्त करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त ए. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक विलास सुतार, संदीप जोरे, उपनिरीक्षक धनंजय गाडे, सहायक फौजदार संतोष जगताप, पोलिस कर्मचारी दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, दिनेश राणे यांच्यासह पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com