Sharad Pawar | जेधे यांनी उपेक्षितांना न्याय मिळवून दिला; शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar
जेधे यांनी उपेक्षितांना न्याय मिळवून दिला; शरद पवार

जेधे यांनी उपेक्षितांना न्याय मिळवून दिला; शरद पवार

पुणे - ‘केशवराव जेधे यांनी कायम सामाजिक परिवर्तनासाठी काम केले. यासाठी त्यांनी दलित आणि उपेक्षितांना न्याय मिळवून दिला. ते जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झाले, तेव्हा पुणे महानगरपालिका नव्हती, तेव्हा नगरपालिका होती. नगरपालिकेत जेधे यांनी पहिला ठराव पुणे शहरातील सर्व घटकांतील मुला-मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा, असा ठराव मांडला होता. त्यांच्या या ठरावाला विरोध करण्यात गायकवाड वाड्यातील वैचारिक किनार होती,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले.

दिवंगत माजी खासदार केशवराव जेधे चरित्र पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, की पुणे शहरातील गायकवाड वाडा आणि जेधे मॅन्शन ही चळवळीचे दोन्ही केंद्र अंतराने अगदी जवळ-जवळ होती. परंतु या दोन्ही केंद्रात वैचारिक अंतर फार मोठे होते. या वैचारिक अंतरामुळेच दिवंगत केशवराव जेधे यांनी तत्कालीन पुणे नगरपालिकेत मुलींच्या शिक्षणाबाबत आणि हौदातील पिण्याचे पाणी दलितांना मिळावा, या मागणीसाठी मांडलेले दोन्ही ठराव नामंजूर केले होते.

हेही वाचा: पुणेकरांना भरली हुडहुडी; राज्यातील सर्वाधिक निचांकी तापमानाची नोंद!

जेधे यांनी दुसरा ठराव हा पुणे शहरातील हौदांमधील पिण्याचे पाणी हे दलितांना मिळाले पाहिजे, अशी मागणी करणारा ठराव मांडला होता. दुर्दैवाने याही ठरावाला विरोध करण्यासाठी गायकवाड वाडा आणि जेधे मॅन्शनमधील वैचारिक अंतरच कारणीभूत ठरले. पर्यायाने केवळ वैचारिक अंतरामुळे हे दोन्ही ठराव पुणे नगरपालिकेत मंजूर होऊ शकले नसल्याची खंत पवार यांनी या वेळी व्यक्त केली.

loading image
go to top