पुणेकरांना भरली हुडहुडी; राज्यातील सर्वाधिक निचांकी तापमानाची नोंद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांना भरली हुडहुडी; राज्यातील सर्वाधिक निचांकी तापमानाची नोंद!

पुणेकरांना भरली हुडहुडी; राज्यातील सर्वाधिक निचांकी तापमानाची नोंद!

पुणे : गुरुवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद पुणे शहरात झाली. शिवाजीनगर येथे १०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. गेल्या चार दिवसांपासून शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढत असून, रोज नव्या निचांकी तापमानाची नोंद होत आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात चार दिवस पुन्हा पाऊस...हवामान विभागाचा इशारा

संपूर्ण राज्यात हवामान कोरडे असून, पुणे शहरासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पुणे शहर आणि परिसरात तर किमान तापमानात रोज एक अंश सेल्सिअसने घट होत आहे. गुरुवारी सरासरीच्या किमान तापमानाच्या तुलनेत ४.८ अंश सेल्सिअसने घट झाल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

त्यामुळे शहर आणि उपनगरात सकाळी कडाक्याच्या थंडीबरोबर धुके पडत आहे. रविवार (ता.१४) पर्यंत शहरात आकाश निरभ्र, हवामान कोरडे आणि सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर थंडी पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. रविवारनंतर मात्र दुपारी अकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी सुद्धा कमी होऊ शकते.

हेही वाचा: कंगना रणौतची पद्मश्री रद्द करा; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याची मागणी

शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

ठिकाण : मंगळवार : बुधवार : गुरुवार

शिवाजीनगर : १२.७ ११.८ १०.९

लोहगाव : १५.० १४.२ १३.९

पाषाण : १३.४ १२.६ ११.५

चिंचवड : १८.१ १७.६ १७.०

लवळे : १७.९ १६.२ १७ .०

मगरपट्टा : १९.१ १८.८ १७.८

loading image
go to top