

ketan agarwal killed case
esakal
पुणे - केतन अग्रवालची वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी १८ जून रोजीच नव्हे, तर त्यापूर्वी १४ जून रोजीही केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून देण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सिया आणि प्रियकर चेतनने थंड डोक्याने कट रचला होता, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुरुवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत दिली.