Ketan Agarwal Murder Case
esakal
त्यानंतर चेतनचे सोशल मीडिया प्रोफाइल आणि छायाचित्रे तपासण्यात आली. त्यांची तुलना सीसीटीव्हीतील हुडी घातलेल्या व्यक्तीशी केल्यानंतर संशयाची खात्री झाली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चेतनला ताब्यात घेतले आणि या धक्कादायक कटाचा उलगडा झाला.केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासातून हा पूर्वनियोजित खून असल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.