पर्यटकांची हुल्लडबाजी धोक्‍याची!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

खडकवासला - धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्या ठिकाणी जीव धोक्‍यात घालून पाण्याजवळ जाणाऱ्या पर्यटकांना  पोलिसांनी अटकाव करण्याची गरज आहे. 

खडकवासला धरणातून पहाटे १४ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते. शुक्रवारी पारशी नववर्षाची सुटी असल्याने मुठा नदीच्या पुलावर गर्दी झाली होती. पर्यटक खडकवासला धरण परिसरात आले होते. 

पाणी सोडल्यानंतर काही पर्यटक खडकवासला गाव (हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत) व एनडीएच्या बाजूने (उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत) नदीच्या पात्रात उतरले. काही जण तर लहान मुलांना घेऊन नदीत उतरले होते. नदीत सोडलेल्या पाण्याच्या जवळ जाऊन सेल्फी व फोटो काढण्याचा हव्यास त्यांना आवरत नव्हता. 

धरणातून होणारा विसर्ग मोठा असल्याने पर्यटकांचे असे वागणे धोक्‍याचे होते. नदीपात्रात पर्यटकांनी उतरू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर फोटो
याबाबत सोशल मीडियावर फोटो व माहिती टाकल्यानंतर उत्तमनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी या ठिकाणी आले आणि त्यांनी नदीत उतरलेल्या पर्यटकांना बाहेर घेतले. याबाबत हवेलीचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके म्हणाले, ‘‘पर्यटकांना नदी पात्रात उतरण्यास बंदी आहे. जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य पर्यटकांनी करू नये.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasala Dam Water Tourist Danger