खडकवासला प्रकल्पातून १८ हजार क्‍युसेक विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

खडकवासला - धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडत असल्याने खडकवासला धरणातून रविवारी सायंकाळी सात वाजता १८ हजार ४९१ क्‍युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. 

खडकवासला - धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडत असल्याने खडकवासला धरणातून रविवारी सायंकाळी सात वाजता १८ हजार ४९१ क्‍युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. 

धरण क्षेत्रातील पाऊस दोन दिवसांपूर्वी बंद झाल्याने पानशेत धरणातील विसर्ग बंद केला होता. खडकवासला धरणातील विसर्गदेखील ८५६ क्‍युसेकपर्यत कमी केला होता. परंतु शनिवारपासून पाऊस वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्ग वाढविला आहे. पानशेत धरणातून ७३७६ क्‍युसेक, वरसगावमधून ६०७७ क्‍युसेक टेमघर धरणातून ७८७ क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणात सुमारे तीन हजार क्‍युसेकचा येवा सुरू आहे.  यंदा १७ जुलै, १७ ऑगस्ट, २० ऑगस्ट व आज २६ ऑगस्ट रोजी १८ हजार ४९१ क्‍युसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे. हा यंदाचा मोठा विसर्ग सुरू आहे. हे पाणी सोडल्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली जातो.

Web Title: Khadakwasala Project Water Release