तीन दिवसांपासून खडकवासला गावात काळोख; बिल थकल्याने महावितरणने मीटर नेले काढून

खडकवासला गावातील पथदिव्यांना होणारा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केला आहे. मागील काही महिन्यांचे बीजबिल थकल्याने महावितरणने कारवाई करत वीजेचे मीटर काढून नेले आहे.
Khadakwasala Village
Khadakwasala VillageSakal
Summary

खडकवासला गावातील पथदिव्यांना होणारा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केला आहे. मागील काही महिन्यांचे बीजबिल थकल्याने महावितरणने कारवाई करत वीजेचे मीटर काढून नेले आहे.

किरकटवाडी - खडकवासला गावातील (Khadakwasala Village) पथदिव्यांना होणारा वीजपुरवठा (Electric Supply) महावितरणने खंडीत (Disconnent) केला आहे. मागील काही महिन्यांचे बीजबिल (Electricity Bill) थकल्याने महावितरणने कारवाई (Crime) करत वीजेचे मीटर काढून नेले आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून खडकवासला गावातील सर्व रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असल्याने तत्परतेने कर गोळा करणाऱ्या महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पथदिवे बंद असल्याने काही नागरिकांनी काही बिघाड झाला की काय याची पाहणी केली असता पेटीत मीटर नसल्याचे दिसून आले. महत्वाचे म्हणजे पेटीवर," सदर वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिल भरल्यानंतर पुन्हा जोडणी केली जाईल," असा संदेश महावितरणच्या वतीने लिहिलेला आहे. सध्या महावितरणची वीजबिल वसुली मोहीम अगदी युद्धपातळीवर सुरू आहे. याची धास्ती अनेकांनी घेतली आहे. वेळेत वीजबिल भरावे यासाठी महावितरणकडून नागरिकांना आवाहनही करण्यात येत आहे. महावितरणच्या आवाहनाकडे पालिकेच्या विद्युत विभागाने दुर्लक्ष करत काही महिन्यांपासून खडकवासला गावातील पथदिव्यांचे वीजबिल थकविल्याने याचा मनःस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत पालिकेच्या विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता एस. जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Khadakwasala Village
वाहतूक पोलिसांमुळे रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे मिळाली

"एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालिका नागरिकांकडून कर वसूल करत आहे त्या प्रमाणात सुविधांचा अभाव जाणवत आहे. तीन ते चार दिवस झालेत खडकवासला गावात पथदिवे पुर्णपणे बंद आहेत. जर कर वसूल करून सुद्धा पालिका मुलभूत सुविधा देऊ शकत नसेल तर गावांना पालिकेत घेऊन काय उपयोग?" शेखर मते, नागरिक ,खडकवासला.

'आतापर्यंत नऊ महिन्यांचा कर पालिकेने गोळा केला आहे तरीही किरकोळ लाईट बिल त्यांना भरता आले नाही. पुर्वी ग्रामपंचायत असताना कधी कनेक्शन तोडले गेले नाही परंतु पालिकेच्या गलथान कारभारामुळे पहिल्यांदा ही वेळ आली आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.'

- महादेव मते, नागरिक, खडकवासला.

"खडकवासला गावातील पथदिव्यांचे वीजबिल भरुन वीजजोडणी पुर्ववत करुन घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील." संजीव ओहोळ, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com