खडकवासलातील पाणीसाठा वाढला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

पुणे - ‘‘खडकवासला धरणाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम ‘ग्रीन थंब’ संस्थेतर्फे सुरू आहे. या धरणातील गाळ मोठ्या प्रमाणात काढल्याने  धरणातील पाणीसाठा वाढला आहे. आतापर्यंत धरणातून साधारण दहा लाख ट्रक माती काढून तिचा उपयोग वृक्षारोपण करण्यासाठी केल्याची माहिती, संस्थेचे अध्यक्ष लेफ्ट. कर्नल सुरेश पाटील (निवृत्त) यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटील म्हणाले, ‘‘खडकवासला धरणातून एप्रिल २०१२ पासून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणाहून काढलेला गाळ पुन्हा जलाशयात वाहून  जाऊ नये, यासाठी कॅट (कॅचमेंट एरिया ट्रॅमेंटमेंट) हे तंत्रज्ञान वापरले जात आहे.

पुणे - ‘‘खडकवासला धरणाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम ‘ग्रीन थंब’ संस्थेतर्फे सुरू आहे. या धरणातील गाळ मोठ्या प्रमाणात काढल्याने  धरणातील पाणीसाठा वाढला आहे. आतापर्यंत धरणातून साधारण दहा लाख ट्रक माती काढून तिचा उपयोग वृक्षारोपण करण्यासाठी केल्याची माहिती, संस्थेचे अध्यक्ष लेफ्ट. कर्नल सुरेश पाटील (निवृत्त) यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटील म्हणाले, ‘‘खडकवासला धरणातून एप्रिल २०१२ पासून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणाहून काढलेला गाळ पुन्हा जलाशयात वाहून  जाऊ नये, यासाठी कॅट (कॅचमेंट एरिया ट्रॅमेंटमेंट) हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. या ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने वृक्षारोपण केले जात असून आतापर्यंत दोन लाखांच्या आसपास झाडे लावली आहेत. ‘प्रत्येकाने एक झाड लावावे’ हा उपक्रम लवकरच सुरू करणार आहे.’’

Web Title: khadakwasala water storage increase