esakal | खडकवासला: वरसगाव धरणातून १७१७ क्‍युसेक विसर्ग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

khadakwasla

खडकवासला: वरसगाव धरणातून १७१७ क्‍युसेक विसर्ग सुरू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

खडकवासला: धरण साखळी क्षेत्रात पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. परिणामी वरसगाव धरणातून पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या वरसगाव धरण शंभर टक्के भरले आहे. मागील चार-पाच दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारी २४ तासात धरण साखळीत चांगलाच पाऊस पडला परिणामी वरसगाव धरणातून गुरुवारी संध्याकाळी पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा: इंदापूर मूकबधिर शाळा 'माझी वसुंधरा' अभियानात सहभागी

सुरुवातीला १७१७ क्‍युसेक पाणी मोसे नदीत सोडले. रात्री दहा वाजता २६६५ शुक्रवारी पहाटे तीन वाजता ४४४२ पर्यंत विसर्ग वाढवला. शुक्रवारी पावसाचा दिवसभरात जोर कमी झाल्याने हा विसर्ग १७१७ क्युसेक पर्यंत कमी केला. अशी माहिती शाखा अभियंता तुळशीदास आंधळे यांनी दिली.

दरम्यान, खडकवासला धरणात आज दुपारी बारा वाजता ७५ टक्के साठा झाल्यामुळे शुक्रवारी दुपारी कालव्यातून २०० क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ७०० क्यूसेक पर्यत वाढविला. सातशे दोन पर्यंत पाणी सोडले. कालवा पूर्ण क्षमतेने म्हणजे ११५० क्यूसेक सोडून पावसाळ्यातील दुसरे आवर्तन सध्या सुरू केले आहे. अशी माहिती शाखा अभियंता आर.व्ही. राऊत यांनी दिली.

गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या 35 तासात टेमघर येथे ११५ मिलिमीटर, वरसगाव येथे ३६ मिलिमीटर बोरगाव येथे ३७ आणि खडकवासला ८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता धरणस्थिती :

धरणाचे नाव- एकूण क्षमता (टीएमसी) / उपयुक्त साठा (टीएमसी) / टक्केवारी

खडकवासला- १.९७ / १.५५ / ७८.३९

पानशेत- १०.६५ / १०.३२ / ९६.९०

वरसगाव- १२.८२ / १०.८२ / १००

टेमघर- ३.७१ / ३.५४ / ९५.५०

चार धरणात एकूण पाणीसाठा एकूण साठवण क्षमता २९.१५ टीएमसी / २८.२३ आज उपयुक्त पाणीसाठा / ९६.८३ टक्केवारी

loading image
go to top