Water : पुण्यासाठी सव्वासात टीएमसी पाणी राखून ठेवावे; सजग नागरिक मंचाची पालकमंत्र्यांकडे मागणी

उन्हाळ्यामध्ये खडकवासला धरणातील पाणी साठा झपाट्याने खालावत आहे.
Khadakwasla Dam
Khadakwasla DamSakal

पुणे - उन्हाळ्यामध्ये खडकवासला धरणातील पाणी साठा झपाट्याने खालावत आहे. सध्या ९.४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असला तरी जुलै पर्यंत पुण्यासाठी सव्वापाच टीएमसी पाण्याची गरज आहे. पण बाष्फीभवनामुळे धरणातील सुमारे दीड टीएमसी पाणी कमी होणार आहे.

भविष्यात पुण्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने शहरासाठी ७.५ टीएमसी पाणी राखीव ठेवावे अशी मागणी सजग नागरिक मंचाने पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

खडकवासला धरण साखळीत ९.४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पुणे शहरासाठी दरमहा १.६ टीएमसी पाण्याची गरज आहे. ३१ जुलै पर्यंत ५.२५ टीएमसी पाण्याची गरज आहे. उन्हाळ्याचा कडाका बघता पुढील तीन महिन्यात किमान सव्वा ते दीड टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होऊ शकते. जून महिन्यात वारीसाठी किमान अर्धा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. तसेच मे महिन्यात दौंडसह इतर गावांना पिण्यासाठी दीड टीएमसीचे आवर्तन सोडावे लागेल.

महापालिका दरवर्षी सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध करुण देते, त्यामुळे शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही. निवडणूका संपल्यानंतर पुण्यात पाणी कपात सुरु होईल अशी लोकांमध्ये भीती आहे. त्यामुळे शहरासाठी ७.२५ टीएमसी पाणी राखून ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागाला द्यावेत अशी मागणी पालकमंत्री पवार यांच्याकडे मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com