Panshet Dam Update : पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; खडकवासला धरणात पाणीसाठा वाढला
Khadakwasla Dam : सह्याद्री घाटमाथ्यावरच्या मुसळधार पावसामुळे पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांमध्ये सुमारे ९५% साठा झाला असून, ४०००+ क्युसेक विसर्ग खडकवासला धरणात सुरू आहे.
खडकवासला : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी पानशेत, वरसगाव व टेमघर धरणातील पाण्याची आवक वाढली असून, धरणात सुमारे ९५ टक्के पाणी जमा झाले आहे. तिन्ही धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.