खडकवासला धरण 43 टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

125 दिवसाचे पाणी जमा
चार हि धरणात मिळून 5 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. शहराला दररोज 40 दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असते. त्यानुसार, हे पाणी 125 पुरेल एवढे आहे.

खडकवासला - पुणे शहर परिसरातील धरण क्षेत्रात आजही (मंगळवार) पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. मंगळवारी खडकवासला धरणात 43 टक्के पाणीसाठी जमा झाला असून, धरण लवकरच निम्मे भरणार आहे.

गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी मागील चार दिवसात पडलेल्या पावसामुळे ओढे ओहोळ यांना चांगले पाणी असून त्यामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. टेमघर धरणातील पावसाने 628 मिमी पाऊस झाला आहे. शून्य पाणीसाठा असलेल्या या धरणात आता पाणी जमा होण्यास सुरवात झाली आहे. 

मंगळवार सकाळी सहा वाजता धरणातील स्थिती 
धरणाचे नाव- 24 तासातील पाऊस /1जून पासूनचा पाऊस/पाणीसाठा टीएमसी मध्ये/ धरणातील टक्केवारी
टेमघर -53/628/0.30/8.08
पानशेत-48/463/2.24/21.02
वरसगाव-57/479/1.66/12.96
खडकवासला-29/233/0.86/43.34
चार धरणातील एकूण पाणीसाठा- 5.06टीएमसीमध्ये, 17.34% 
मागील वर्षीचा पाणीसाठा - 7.31टीएमसीमध्ये, 25.08 % 

Web Title: Khadakwasla dam storage is 43 percent