खडकवासल्यातून पुन्हा विसर्ग सुरू

khadakwasla.jpg
khadakwasla.jpg

खडकवासला : धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ओढे- नाले वाहत असल्याने खडकवासला धगरणातील पाणी साठा 100 टक्के पेक्षा अधिक वाढत आहे म्हणून खडकवासला धरणातून मंगळवारी संध्याकाळ पासून सात वाजता 856 क्यूसेकने पाणी मुठा नदीत सोडले आहे.

मागील आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्याने सोमवारी खडकवासला धरणातील विसर्ग 856क्यूसेक होता. तो सकाळी नऊ वाजता पूर्णपणे बंद केला परंतु अवघ्या 36 तासात धरणातील पाणीसाठा 100 टक्के पेक्षा हळूहळू वाढत गेला.  म्हणून खडकवासला धरणाचा एक दरवाजा एक फुटाने उघडण्यात आलेला आहे त्यातून 856 क्यूसेक पाणी सोडले.

पानशेत, वरसगाव व टेमघर या तिन्ही धरणाच्या वीज निर्मिती साठी प्रत्येकी 600 क्यूसेक पाणी सोडले आहे. हे एक हजार 800 क्यूसेक तर पाणी जमा होत आहे. तर फक्त खडकवासला धरणात एक हजार क्युसेक्सची आवक आहे.
अशा प्रकारे 2800 क्यूसेक पाणी जमा होत आहे. खडकवासला धरणातून कालव्यातून एक हजार क्यूसेक, शहर व अन्य पाणी योजनांसाठी सुमारे 300 क्युसेक असे मिळून 1800 क्यूसेक पाणी धरणातून बाहेर सोडले जात आहे. उर्वरित हजार क्यूसेक जमा पाणी समतोल राखण्यासाठी खडकवासला धरणातून 856 क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. असे खडकवासला पाटबंधारे विभागाने सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com