esakal | शिवणे येथे पाच मजली इमारत पाडली | Khadakwasla
sakal

बोलून बातमी शोधा

इमारत पाडली

खडकवासला : शिवणे येथे पाच मजली इमारत पाडली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : शिवणे देशमुखवाडी येथील पाच मजली अनाधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीचे बांधकाम विभागाच्या वतीने जो कट्टर मशिनच्या साह्याने पाडण्यात आले. देशमुखवाडी परिसरात अनधिकृतपणे बांधकाम सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाला मिळाली. त्यानुसार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाईचे नियोजन उपअभियंता देवेंद्र पात्रे व जयवंत पवार कनिष्ठ अभियंता सचिन जावळकर, सतीश शिंदे, गंगाप्रसाद दंडिमे, संग्राम पाटील, संदेश कुळवमोडे यांनी केले.

हेही वाचा: महाराष्ट्रानंतर कर्नाटकातही Income Tax ची धाड

या कारवाईसाठी बहुमजली इमारत पाडण्यासाठी वापरण्यात येणारी जो कटर मशीन वापरण्यात आली होती. याचबरोबर दोन जीसीबी, दोन ब्रेकर, एक गॅस कटर, महापालिकेचे १२ पोलिस, महापालिकेचे १५ बिगारी, उत्तमनगर आणि वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून १०० जणांचा बंदोबस्त होता.

"शिवणे देशमुखवाडी येथील सर्व्हे नंबर ९७ मधील पाच ठिकाणी कारवाई होणार होती. त्यानुसार, महापालिका यंत्रणा घेऊन येणार होती. पाच ठिकाणी कारवाई होणार असल्याने वरीष्ठ अधिकाऱयांच्या सूचनेनुसार पाच ठिकाणी तीन पोलिस निरीक्षक, बारा सहायक पोलिस निरीक्षक व फौजदार व ८६ कर्मचारी असा १०० जणांचा बंदोबस्त नेमला होता."असे उत्तमनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी सांगितले.

loading image
go to top