पुणे : नळाला येतंय थेट धरणातलं दूषीत पाणी | Polluted water | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Polluted Water

पुणे : नळाला येतंय थेट धरणातलं दूषीत पाणी

किरकटवाडी: चार महिन्यांपासून खडकवासला गावाला पुरवठा होत असलेल्या पाण्याचे कोणत्याही प्रकारे निर्जंतुकीकरण करण्यात येत नसून धरणातील पाणी आहे तसे नागरीकांच्या घरी येत आहे. पिण्याच्या पाण्याचे (Drinking water) निर्जंतुकीकरण होत नसल्याने पालिका प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. परिणामी अनेक नागरिक दुषीत पाण्याशी निगडित आजारांनी त्रस्त झाले आहेत. (Khadakwasla Village Polluted Water Supply)

खडकवासला गावचा पालिकेत समावेश झाल्यानंतर दोन महिने ग्रामपंचायतीने विकत घेऊन ठेवलेला पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याच्या ॵषधाचा साठा पुरला. त्यानंतर पालिकेने उपाययोजना करणे अपेक्षित होते मात्र मागील चार महिन्यांपासून औषधाअभावी पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत नाही. धरणातील पाणी टाकीत व टाकीतील पाणी आहे तसे घरोघरी सोडण्यात येत आहे. परिणामी अनेक नागरिक पोटदुखी, सर्दी, खोकला, अतिसार अशा आजारांनी त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा: दुचाकी व ट्रकच्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू; ट्रकचालक फरार

किरकटवाडीतील नागरिकांच्याही तक्रारी

किरकटवाडील नागरिकही दुषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्याबाबत समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी करत आहेत. परिसरातील व्हॉट्स ॲप गृपवर याबाबत चर्चा होत असून अनेकांनी असा अनुभव येत असल्याचे सांगितले आहे. किरकटवाडीला पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी मात्र पाण्यात दररोज निर्जंतुकीकरण पावडर टाकण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

" पाणी निर्जंतुकीकरण करुण मगच सोडण्यात यावे. अनेकांच्या घरी आहे तसेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत."

-शेखर मते, नागरिक, खडकवासला.

" गावाला दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. कधी कधी पाण्याला दुर्गंधी येते. जवळपास प्रत्येक घरातील एक-दोन व्यक्ती या पाण्यामुळे आजारी असल्याचे दिसून येत आहे.पालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये."

-उमेश बोरकर, नागरिक, खडकवासला.

हेही वाचा: उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

"जोपर्यंत ग्रामपंचायत होती तोपर्यंत पाण्याचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. गावचा पालिकेत समावेश झाल्यानंतर तत्कालीन सहाय्यक आयुक्तांना याबाबत सांगितले होते. अद्याप पालिकेकडून कार्यवाही झालेली नाही."

-सौरभ मते, माजी सरपंच खडकवासला.

" खडकवासला गावच्या पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत तात्काळ पाणीपुरवठा विभागाला कळवण्यात येईल."

-संजीव ओहोळ, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newswater
loading image
go to top