खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या स्क्वेअर मार्केटची इमारत धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुणे ः येथील मुख्य बाजारपेठेत असलेली खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाची स्क्वेअर मार्केटची दुमजली इमारत धोकादायक बनली असून, इमारतीला देखभाली अभावी सगळीकडून अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून, वरील मजल्याच्या स्लॅबचे पोपडे पडत आहेत. आतील लोखंडी सळया दिसू लागल्या आहेत, तर काही ठिकाणी छताला मोठमोठ्या चिरा पडल्या आहेत कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता आहे. याकडे अनेक वर्षांपासून बोर्डाचे दुर्लक्ष झालेले आहे. रोजीरोटीचा प्रश्‍न असल्याने येथील व्यापारी, कामगार तणावाच्या वातावरणात दैनंदिन कामकाज करत असतात. प्रशासनाने गांभीर्याने विचार करून इमारतींची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी येथील व्यापारीवर्गाने केली आहे. 

बोर्डाने या दुमजली इमारतीमध्ये व्यावसायिक गाळे काढून भाडेतत्त्वावर व्यापाऱ्यांना दिले आहेत. या इमारतीमध्ये कपड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. इमारत जुनी झाल्यामुळे अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरते. इमारतीच्या छतावर पावसाचे पाणी साचते. पाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे बोर्डाच्या अग्निशामक दलाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात छतावर जाऊन तात्पुरती पाणी जाण्यासाठी पाइपांच्या दुरुस्तीसह स्वछता केली जाते. 

इमारतीच्या चारही बाजूंनी स्लॅबचे मोठमोठे पोपडे कधीही पडतात. छतावर मोठमोठी पिंपळाची झाडे वाढली होती. मध्यंतरी बोर्डाने ती वरच्यावर काढली, मात्र त्याच्या मुळ्या इमारतीत पसरल्यामुळे इमारतीला धोका होऊ शकतो. वरच्या मजल्यावरील व्हरांड्यामध्ये अनेक ठिकाणी स्लॅबला चिरा पडल्या आहेत, तर काही ठिकाणी स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आहे. 

ही इमारत मुख्य बाजारपेठेत असल्याने या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ग्राहक, व्यावसायिकांसह कामगारांची वर्दळ असते. दुर्दैवाने इमारतीबाबत अनुचित घटना घडली, तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. 
बोर्डाने सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने इमारतींची दुरुस्ती, देखभाल करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील व्यापाऱ्यांसह स्थानिक रहिवासी करीत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadki cantonment Board's building in a dangerous condition