esakal | Khadki कॅन्टोमेंट बोर्डाच्या त्रिसदसीय समितीत भापकर यांची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

 दुर्योधन भापकर

खडकी : कॅन्टोमेंट बोर्डाच्या त्रिसदसीय समितीत भापकर यांची नियुक्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खडकी, ता.6- खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या त्रिसदसीय समितीसाठी जनतेचा प्रतिनिधी म्हणून दुर्योधन भापकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रक्षा मंत्रालकडून याबाबत ची अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यामुळे खडकीतील नागरिकांच्या समस्या मार्गी लागणार अशी चर्चा रंगली आहे. देशभरातून 62 कॅन्टोमेंट बोर्ड पैकी 55 कॅन्टोमेंट बोर्डाचा कार्यकाल दोनदा मुदतवाद दिल्यानंतर 10 फेब्रुवारी 2021 रोजी संपल्याने हे बोर्ड बरखास्त करण्यात आले होते.

हेही वाचा: वाशीम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा      

त्यानंतर केंद्राकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने रक्षा मंत्रालयाकडून कॅन्टोमेंट बोर्डाची पुनर्रचना करण्यात आली असून त्यात अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व जनतेचा नामनिर्देशीत एक प्रतिनिधी अशी त्रिसदसीय समिती स्थापना करण्यात आली आहे. सध्या 11 कॅन्टोमेंट बोर्डाचे नामनिर्देशन जारी करण्यात आले असून त्यात खडकी कॅन्टोमेंट बोर्डासाठी दुर्योधन भापकर यांच्या नावाची वर्णी लागली आहे. दरम्यान 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत या नियुक्तीची मुदत आहे.

बोर्ड बरखास्त झाल्या पासून नागरिकांना समस्या मांडण्यास अडचणी येत होत्या. आता समिती झाल्याने नागरिकांचे प्रश्न विचारात घेतले जातील. तसेच खडकी बोर्ड हद्दीतील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाईल. अशी प्रतिक्रिया दुर्योधन भापकर यांनी सकाळशी बोलताना दिली.

loading image
go to top