कोकेन घेऊन तरुणीला पोलिसांनीच पार्टीत पाठवलं, कारवाई बनावट; प्रांजल यांच्या वकिलाचा खळबळजनक दावा

Kharadi Reve Party Case : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीय. तरुणींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीय.
Kharadi Rave Party: Lawyer Alleges Police planted girl in party
Kharadi Rave Party: Lawyer Alleges Police planted girl in partyEsakal
Updated on

खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीय. तरुणींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीय. आरोपींकडून तपासात सहकार्य करण्यात येत नाही. एप्रिल आणि मे महिन्यातली त्याच हॉटेलमध्ये पार्टी झाली होती अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. दरम्यान, आता प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी खोटी माहिती देत बदनामी केली असून ५० कोटींचा दावा दाखल करणार असल्याचं प्रांजल यांच्या वकिलांनी सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com