राजकीय स्थितीवर "कल्पक' पोस्टची "बनवाबनवी' 

महेंद्र बडदे 
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

"अशी ही बनवाबनवी', "हळद रुसली कुंकू हसले', "रईस' नको "काबील' उमेदवाराला मते द्या ! अशा सोशल मीडियावर फिरणाऱ्या "पोस्ट' प्रचाराबरोबरच मनोरंजक ठरत आहेत. निवडणूक म्हटले, की प्रतिस्पर्धी पक्ष, उमेदवाराच्या कारभाराचे वाभाडे काढणे, त्यावर टीका करणे, आपली धोरणे, जाहीरनामा - वचननामा नागरिकांपर्यंत पोचविणे हे आलेच. हे काम प्रभावीपणे करण्यासाठी निवडणुकीच्या लढाईत या शस्त्राचा वापर आता जोरदारपणे सुरू झालाय. या माध्यमातून मोबाईल, संगणकावर येणाऱ्या "पोस्ट' पाहिल्यानंतर ते करणाऱ्यांच्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. 

पारंपरिक प्रचाराच्या साधनांचा वापर होत असला, तरी "सोशल मीडिया' ही प्रभावीपणे वापरला जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून "सोशल मीडिया'चे शस्त्र उमेदवारांच्या हाती दिसू लागले. महापालिका निवडणुकीत तर "सोशल मीडिया'चा वापर प्रचंड वाढला आहे. उमेदवारांनी तयार केलेल्या "व्हॉट्‌सऍप' ग्रुप वरील "पोस्ट' इतरत्र "व्हायरल' होण्यास वेळ लागत नाही. "फेसबुक' वर दैनंदिन प्रचाराच्या "पोस्ट'च सध्या पाहण्यास मिळत आहेत. या "सोशल मीडिया'चा वापर करताना पक्ष, उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते किंवा संबंधित नियुक्त केलेल्या "यंत्रणे'कडून नवीन "मेसेज' सोडले जात असतात. 

गेल्या दोन दिवसांपासून चित्रपटांची नावे आणि त्यांचे "पोस्टर्स' एडिट करून सर्वत्र सोशल मीडियावर फिरविले जात आहेत. त्यात शिवसेना-भाजपच्या स्थितीवर "अशी ही बनवाबनवी' या नावाची पोस्ट आहे, तर शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस यांच्या स्थितीवर "हळद रुसली कुंकू हसले' या चित्रपटाचे "पोस्टर' "एडिट' करून फिरविले जात आहे. सध्या गाजत असलेल्या दोन चित्रपटांच्या नावाचा संदर्भ घेत "रईस' नको "काबील' उमेदवार निवडा, असा "मेसेज' फिरत आहे. एरवी वर्तमानपत्रातून दिसणाऱ्या व्यंग्यचित्राच्याही "पोस्ट' फिरत आहेत, त्यामुळे अनेक "व्हॉट्‌सऍप'चे ऍडमीन वैतागले आहेत. काही "ग्रुप'वर राजकीय पोस्ट टाकू नका, अशी सक्त ताकीद ऍडमीन देत आहेत. सोशल मीडियावर "व्हायरल' होणारा हा मजकूर कोणत्या उमेदवाराला, पक्षासाठी "व्हायरस' ठरणार, यासाठी थोडी वाट पाहावीच लागेल.

Web Title: kharbarbat social media