खरिपाच्या पेरण्या जिल्ह्यात रखडल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे - पावसाने उघडीप दिल्यामुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. खरीप पिकाच्या सुमारे सव्वादोन लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी केवळ ५१ हजार हेक्‍टरवर (२२ टक्‍के) बाजरी, भात, सोयाबीन, भुईमूग, मूग, मका आणि ज्वारीची पेरणी झाली आहे. गतवर्षी या तारखेपर्यंत ४० टक्‍के पेरण्या झाल्या होत्या.

पुणे जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८२९.१० मिलिमीटर आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली; परंतु गेल्या काही दिवसांत बहुतांश भागात पावसाने उघडीप दिल्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. 

जिल्ह्यात भात क्षेत्र असलेल्या भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यातील एकूण ७२ हजार ९५३ हेक्‍टर क्षेत्रापैकी ३९३ हेक्‍टरवर भाताची पुनर्लागवड करावी लागली आहे. शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर या पूर्वेकडील भागात बाजरीचे पीक घेतले जाते. बाजरीची १४ टक्‍के पेरणी झाली आहे. वेळेवर पाऊस न झाल्यामुळे मुगाचे क्षेत्र कमी झाले आहे. केवळ २० टक्‍के क्षेत्रावर मूग, मका ३३ टक्‍के आणि ११ टक्‍के क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र प्रामुख्याने भोर, जुन्नर, खेड, बारामती आणि आंबेगाव तालुक्‍यात आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील पीक परिस्थिती 
 खरीप पिकाचे क्षेत्र    दोन लाख ३० हजार ८३५ हेक्‍टर
 ३ जुलैअखेर पेरणी    ५१ हजार १२ हेक्‍टर (२२ टक्‍के)

पीकनिहाय एकूण क्षेत्र 
आणि कंसात झालेली पेरणी (हेक्‍टरमध्ये)

भात    ७२ हजार ९७३  (५८२०)
बाजरी    ४४ हजार ९४  (५९८१)
मूग    ८ हजार ६९ (५९८१)
भुईमूग    ४१ हजार ४०९ (४६८२)
सोयाबीन    ५ हजार २०० (८८००)
मका     ११ हजार १८३ (३६९५)

Web Title: Kharip Cultivation Stop by Rain