

Pune
esakal
खेड: तालुक्यातील मेटे परिसरात शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून तिघांनी उडी मारली. या धक्कादायक घटनेत अंजनी बौद्धवाडी येथील शुभ्रा अतिश दिवेकर (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सचिन सत्यवान जुवळे आणि त्याच्यासोबत असलेले एक लहान मूल जखमी झाले. त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभ्रा दिवेकर, सचिन जुवळे आणि एक लहान मूल मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते.