esakal | खेड शिवापूर : टोलमाफी असूनही फास्टॅगधारकांना भुर्दंड
sakal

बोलून बातमी शोधा

pune

खेड शिवापूर : टोलमाफी असूनही फास्टॅगधारकांना भुर्दंड

sakal_logo
By
महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर टोलमाफी असूनही फास्टॅगधारक एम एच 12 आणि एम एच 14 या वाहनांना टोलमाफी ऐवजी भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा वजा झालेला टोल परत मिळावा किंवा टोल माफी असलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवावी, अशी मागणी स्थानिक प्रवासी करत आहेत. मात्र आमच्याकडे त्याचा काहीही ईलाज नाही, असे सांगून टोल प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर टोल नाका हटविण्यासाठी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खेड-शिवापूर टोल नाक्यावरून हवेली (पुणे शहर+ पिंपरी चिंचवड), भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर या तालुक्यातील वाहनांना टोल माफी देण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांनी सांगितले होते. तेव्हापासून या टोल नाक्यावर या पाच तालुक्यातील वाहनांना टोल माफी देण्यात येत आहे. मात्र याच तालुक्यातील फास्टॅगधारक वाहनांचा मात्र फास्टॅगमधून टोल वजा होत आहे. त्यामुळे स्थानिक असूनही त्यांना टोलमाफी मिळत नसून भुर्दंड सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: 97 लाख रुपये चोरणाऱ्या चोरांना पुणे व नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टोल माफी असलेल्या वाहनांच्या फास्टॅगमधून खेड-शिवापूर टोल नाक्यावर पैसे वजा झाल्यास ते पैसे परत मिळावेत. अथवा अशा टोल माफी असलेल्या वाहनांसाठी फास्टॅग सेन्सर नसलेल्या स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक प्रवासी करत आहेत.

याबाबत पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले, "स्थानिक असल्याचे ओळखपत्र दाखविल्यानंतर टोल माफी असलेल्या वाहनांना खेड-शिवापूर टोल नाक्यावर विना टोल सोडले जात आहे. मात्र टोल माफी असलेल्या वाहनांच्या फास्टॅगमधून टोल वजा होऊ नये यासाठी कोणतेही उपाययोजना आमच्याकडे नाही. स्थानिक प्रवाशांनी एकतर येथून प्रवास करताना वाहनांचा फास्टॅग बाजूला काढून ठेवावा नाहीतर स्थानिकांसाठी असलेला मासिक पास घ्यावा."

कृती समितीने आवाज उठवावा

टोल माफी असूनही फास्टॅग असलेल्या स्थानिक वाहनांना खेड-शिवापूर टोल नाक्यावर टोल माफीचा फायदा मिळत नाही. हा प्रकार टोल प्रशासनाच्या निदर्शनास आणला तरी ते त्याची गंभीरतेने दखल घेत नाहीत. त्यामुळे टोलमाफी असूनही होणाऱ्या टोल वसुली विरोधात खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने आवाज उठवावा, अशी मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.

loading image
go to top