esakal | 97 लाख रुपये चोरणाऱ्या चोरांना पुणे व नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime

97 लाख रुपये चोरणाऱ्या चोरांना पुणे व नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सुकामेवा विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या व्यावसायिक लघुशंकेसाठी उतरल्यानंतर कारमध्ये ठेवलेली 97 लाख रुपयांची रोकड कारसह पळवून नेणाऱ्या चालकासह त्याच्या साथीदाराला पुणे व नगरच्या कर्जत पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये अटक केली. त्यांच्याकडुन 60 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले.विजय महादेव हुलगुंडे (वय 25, रा. काटेवाडी, जामखेड,नगर), व नाना रामचंद्र माने (वय 25 वर्षे रा.मलठण, कर्जत,नगर) व विजय महादेव हुलगुडे (रा. जामखेड) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर पोलिसांनाही खबर देण्यात आली. नगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आरोपींचा शोध घेणेबाबत सूचना दिल्या होत्या.याप्रकरणी येरवडा पोलिस, गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलिस आरोपीचा शोध घेत होते.कर्जत पोलीस तपास करत असताना संबंधित आरोपी पुरंदरमधील विर येथे असल्याची खात्रीशीर बातमी बातमीदाराकडून मिळाली. आरोपी कर्जत-जामखेड परिसरातील असल्याने त्यांची गुन्ह्याची पद्धत माहिती असल्याने कर्जत पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या.

क्राईम युनिट 5 चे पोलिसांनाही वीर येथे बोलाविण्यात आले.आरोपी वीर येथील एका शाळेजवळ लपून बसलेले होते. ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी नाना माने मिळून आला आणि आरोपी विजय हुलगुंडे पळून गेला, त्यास कर्जत पोलिसांनी पाठलाग करून पकडला. आरोपींना कर्जत पोस्टे येथे आणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोस्टेचे तपासी अंमलदार सपोनि रवींद्र आळेकर आणि क्राईम युनिट 5 चे सपोनि प्रसाद लोणारे यांच्या ताब्यात देण्यात आले.कर्जत आणि पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली.

हेही वाचा: Pune: कोथरूड मध्ये विविध चौकात प्रेरणादायी शिल्प

याप्रकरणी 50 वर्षीय व्यक्तिने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा सुकामेवा विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी ते दिवसभर मालाची विक्री केलेल्या व्यावसायिकांकडुन पैसे घेऊन जात होते. ते लघुशंकेसाठी उतरल्यानंतर कारमध्ये ठेवलेली 97 लाख रुपयांची रोकड कारसह चालकाने पळवून नेली होती. आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले. पुणे पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, प्रसाद लोणारे व त्यांचे पोलीस जवान यांनी कर्जत पोलिसांच्या मदतीने 60 लाख रु हस्तगत केले असून कर्जत पोलिसांनी रक्कम हस्तगत करण्यासाठी मोठी मदत पुणे पोलिसांना केली. पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहे.

loading image
go to top