खेड-शिवापूर : विनाकारण घराबाहेर फिराल तर थेट कोविड सेंटरमध्ये जालं!

कोरोनाचे नियम तोडणाऱ्या नागरिकांना घडणार अद्दल
lockdown
lockdownSakal Media

खेड-शिवापूर : "विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना अँटीजन चाचणी करण्यात येईल. या चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास त्या व्यक्तीची कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावं, विनाकारण घराबाहेर पडू नये," असं आवाहन राजगडचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी केलं आहे. (Khed Shivapur If you walk out of the house without any reason you go directly to covid Center)

lockdown
बारामती : नियंत्रण सुटल्यानं दुचाकी कालव्यात कोसळली; आजोबा-नातीचा अंत

राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक नागरीक विनाकारण घराबाहेर फिरताना आढळून येत आहेत. तर अनेक व्यावसायिक वारंवार पोलिसांनी सूचना करून, कारवाई करूनही चोरून दुकाने सुरू ठेवत आहेत. या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या वेळेनंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांना आणि विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना लगाम बसावा यासाठी त्यांना पकडून त्यांची अँटीजन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राजगड पोलिसांनी घेतला आहे.

lockdown
गरिबांच्या बिटको, हुसेन रुग्णालयात श्रीमंतांचे अतिक्रमण

अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अकरा वाजल्यानंतरही दिवसभर अनेक व्यावसायिक चोरून दुकाने सुरू ठेवत आहेत. सकाळी अकरा वाजल्यानंतरही किराणा साहित्य, भाजीपाला, दूध मिळत असल्याने अनेक जण दिवसभर बाहेर फिरताना आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राजगड पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

याबाबत राजगडचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे म्हणाले, "अनेक व्यावसायिक आणि नागरीक वारंवार सूचना तसेच कारवाई करूनही याचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नियमांचं पालन न करणाऱ्या व्यावसायिकांची आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात येईल. त्यात पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधिताला कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com