खेड-शिवापूर टोल नाका स्थलांतरित करावा; वाहनचालकांची मागणी

वाहनांच्या गर्दीपुढे फास्टॅगचे लोटांगण या मथळ्याची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. त्यावर वाचकांनी टोल नाक्याबाबतच्या व्यवस्थेविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Khed-Shivapur-Toll-Naka
Khed-Shivapur-Toll-Nakasakal
Summary

वाहनांच्या गर्दीपुढे फास्टॅगचे लोटांगण या मथळ्याची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. त्यावर वाचकांनी टोल नाक्याबाबतच्या व्यवस्थेविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पुणे - ‘खेड-शिवापूर टोल नाक्यावरील गर्दी कमी करायची असेल, तर तो शिरवळ याठिकाणी स्थलांतरित केला पाहिजे. टोल बूथजवळ गाडी येईपर्यंत गाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा प्रत्येक रांगेत हातात मशिन घेऊन कर्मचाऱ्यांनी टोलचे पैसे घ्यावेत, त्यामुळे वेळ वाचेल आणि गर्दी होणार नाही,’ असे वाहनचालक राहुल पोकळे यांचे मत आहे.

वाहनांच्या गर्दीपुढे फास्टॅगचे लोटांगण या मथळ्याची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. त्यावर वाचकांनी टोल नाक्याबाबतच्या व्यवस्थेविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टोल नाक्यावर जी गर्दी होते, ती टाळण्यासाठी खालील उपाय करावेत. एमएच १२ क्रमांकाच्या चारचाकींसाठी दोन रांगा वेगळ्या ठेवा. त्यांना टोलमध्ये सवलत आहे किंवा नाही, याची मोठी पाटी टोल नाक्यापासून अर्धा किलोमीटरआधीच लावावी. मोठ्या ट्रकसाठी वेगळी लेन ठेवावी. ज्या वाहनधारकांशी कटकट चालू होते, फास्टटॅग व्यवस्थित चालत नाही अशांना ताबडतोब रांगेतून पुढे काढून त्यांच्याशी जो काही वाद असेल तो घालावा. टोल नाक्यावरील कामगारांचे पोलिस व्हेरीफिकेशन केलेले असले पाहिजे.

- अनिल दुरुगकर, पिंगळे वस्ती, मुंढवा

टोलनाक्यावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. एका मिनिटात एका बूथवरून किती वाहने जातात, याच्या सरासरीचा अभ्यास केला पाहिजे. वाहनांच्या प्रकारानुसार वर्गीकरण केले पाहिजे. हा अभ्यास करून टोल बूथची संख्या असली पाहिजे.

- उल्हास घुगरदरे, वडगाव बुद्रुक

फास्टटॅग पुढील काचेवरील निर्देशित जागेवर चिकटवणे बंधनकारक करावे. जिथून फास्टटॅग कॅमेऱ्याकडून वाचला जाऊ शकतो तिथे विंडशिल्ड स्टॅाप साईन लावावी. रोखीने टोल भरणाऱ्यांसाठी वेगळी रांग ठेवावी.

- हेमंत गडकरी, बाणेर

खेड शिवापूर टोल नाका अजून रुंद करावा. रांगांना शिस्त लावावी. वाहने कशीही घुसतात. जड वाहनांसाठी टोल नाक्यापासून पुढे आतील बाजूस टोल नाका करावा.

- संजय बाबर, कोथरूड

मुळात शिवापूर टोल नाका पुढे १० किलोमीटरवर हलविला पाहिजे. बंगळूर महामार्गावर खूपच वाहतूक असते. शहराच्या जवळ असल्यामुळे स्थानिक वाहने आणि महामार्गावरील वाहने एकत्र येतात. म्हणूनच स्थानक नागरिकांची भांडणे होतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. टोलमध्ये स्थानिकांना सूट द्यावी.

- संजय लोंढे

दोन दिवसांपूर्वी टोल नाक्याजवळ एका लग्नाला चारचाकी घेऊन गेलो होतो. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिकांना टोल लागत नाही असे समजले. टोलवरील व्यक्तीला जाताना व येताना दोन्ही वेळा हे सांगितले, तरी जाताना ११० रुपये व येताना ५५ रुपये टोल कट झाला. जायच्या आधी मी फास्टटॅगवर पेपर लावून तो पॅक केला होता. याबाबत कोणीही कुठलीही माहिती दिली नाही. टोलमधून सवलत आहे, की नाही याचा खुलासा व्हावा.

- श्रीराम कुलकर्णी, कात्रज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com