कोंडीमुळे प्रवासी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

खेड-शिवापूर -  पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता. भोर) येथे गुरुवारी (ता. ११) सकाळी दोन कंटेनरचा अपघात झाला. कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरू असताना तब्बल पाच तास वाहतुकीची कोंडी झाली. नवीन बोगद्यामार्गे दरी पुलापर्यंत, तर जुन्या घाट रस्त्यावर भिलारेवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी येथील माउली पार्क समोरून एक कंटेनर साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. या वेळी दुसरा एक कंटेनर पाठीमागून या कंटेनरला धडकला. त्यात कोणाला दुखापत झाली नाही, मात्र दोन्ही कंटेनर रस्त्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली. 

या अपघाताची माहिती मिळताच शिंदेवाडी पोलिस आणि महामार्ग पोलिस ताबडतोब घटनास्थळी आले. पोलिसांनी खासगी क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरू केले. त्यासाठी पुणे-सातारा लेनवरील वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे सातारा लेनवर सकाळी आठ वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त गर्दी होती. त्यामुळे नवीन बोगद्यामार्गे दरी पुलापर्यंत तर जुन्या घाट रस्त्यावर भिलारेवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.  

सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना या वाहतूक कोंडीत अडकावे लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक शाळांच्या बस वाहतूक कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोचण्यास उशीर झाला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.

पोलिसांना प्रतिसाद नाही
अपघात झाल्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पेट्रोलिंग पथक आणि रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांना क्रेन बाजूला घेण्यासाठी फोन करत होतो. मात्र, त्यांनी वेळेत यंत्रणा उपलब्ध न केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: khed shivapur traffic