
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
मुंबई-कल्याण-डोंबिवलीत नाक्यानाक्यावर वडापाव मिळतो. अनेक ठिकाणचे वडापाव गेल्या काही वर्षांत नावारूपाला आले आहेत. मात्र कल्याणच्या वझे कुटुंबाने आपल्या वड्याची चव आणि लोकप्रियता वेळीच ओळखली आणि त्याचे अधिकृत पेटंट मिळवले. आज ‘खिडकी वडा’च्या फक्त फ्रेंचायझी नाहीयेत तर कोकणातील दापोलीमध्ये नऊ महिने टिकेल आणि वेगवेगळे पदार्थ तयार करता येतील असा ‘खिडकी वडा मसाला’ बनवण्याची फॅक्टरी उभी राहिली आहे.