'खिलारी' हे समाज मनाची नाळ जाणणारे द्रष्टे नेते होते

Khilari is the leader in junnar area
Khilari is the leader in junnar area

जुन्नर- काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते बाळासाहेब खिलारी हे समाज मनाची नाळ जाणणारे द्रष्टे नेते होते. तत्वाशी बांधिलकी, विचाराशी एकनिष्ठ, स्पष्टवक्ते, हजरजबाबीपणा, पक्षनिष्ठा या गुणांमुळे ते सार्वजनिक जीवनात यशस्वी ठरले असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी आज बुधवार (ता. 5) रोजी यांच्या शोकसभेत व्यक्त केले.

जुन्नरला पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन, श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व मराठा ज्ञाती विद्या विकास निधी संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब रखमाजी खिलारी यांच्या शोकसभे प्रसंगी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी बाळासाहेब खिलारी यांच्या शिंदे गावच्या सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, जिल्हा दूध संघाचे संचालक ते चेअरमन, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्था व मराठा ज्ञाती विद्या विकास संस्था आदी संस्था प्रगतीपथावर नेण्यात बाळासाहेब यांचे मोलाचे योगदान असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या जीवनकार्याची माहिती सीताराम खिलारी यांनी दिली.

यावेळी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट, श्री विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, देवदत्त निकम, अतुल बेनके, बापूसाहेब भुजबळ, शरद लेंडे, तान्हाजी बेनके, गणपत फुलवडे, शाम पांडे, देवराम लांडे, मंगलदास बांदल, विठ्ठलबाबा मांडे,डॉ कैलास गायकवाड आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मराठा ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष संजय पानसरे, विघ्नहर चे उपाध्यक्ष अशोकराव घोलप, माजी नगराध्यक्ष किरण परदेशी, सरपंच मीरा खिलारी, अविनाश भगत, नंदू पानसरे, मारुती वायळ, उपसभापती उदय भोपे, सुभाष मोहरे, केरभाऊ ढोमसे, पांडुरंग मोढवे, हबीब मणियार, श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, अण्णासाहेब आवटे विद्यालय व प्राथमिक विद्यालय बारवचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com