खचलेल्या मार्गाची डागडुजी, एस.टी.बस परत जाऊ लागली खिरेश्वरला

पराग जगताप
सोमवार, 23 जुलै 2018

ओतूर - जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील एक प्रमुख मार्ग असलेल्या पिंपळगाव जोगा, सांगणोरे ते खिरेश्वर मार्गा दरम्यान कोल्हेवाडीजवळ ओढ्यालगत रस्ता थोडा खचला होता तो भराव टाकून दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच त्यामुळे कोल्हेवाडी पर्यंतच जाणारी एस.टी.बस परत खिरेश्वर गावा पर्यंत जाऊल लागल्याने नागरिकांचा दळणवळनाचा प्रश्न मार्गि लागला आहे.

याबाबत सकाळ मध्ये दहा जुलैला सांगणोरे खिरेश्वर दरम्यान रस्ता खचला या मथळ्या खाली वृत्त छापून आले होते,शिवाय त्या आधी 8 जुलैल स्थानिक नागरिकांचा रस्ता खचलेला दाखवतानाचा विडिओ सकाळ फेसबुकच्या माध्यमातून व्हाईरल झाला होता. त्यामुळे सदर रस्त्याच्या डागडुजीला वेग आला होता.

जिल्ह परीषद सदस्य अंकुश आमले यांच्या प्रयत्नाने व  मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक नागरिक बुधाजी शिंगाडे सरपंच अनिता शिंगाडे, सरपंच उषा सुपे, गेणु उंडे, पोपट मेमाणे, उत्तम मेमाणे, प्रा.संजय मेमाणे, अभिजीत भौरले व इतरांच्या उपस्थितीत सदर खचलेला मार्गाची डागडुजी पावसामुळे सहा ते सात दिवस चालु होती. डागडुजी पुर्ण झाल्यावर अंकुश आमले यानी नारायणगाव आगार प्रमुख रामनाथ मगर यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधून रस्त्याची डागडुजी केल्याची कळवले आणि अपेक्षीत पत्र व्यवाहार पुर्ण करुन घेतला. ओतूर खिरेश्वर एस.टी.बस.सेवा जी कोल्हेवाडी पर्यंतच जात होती ती परत खिरेश्वर गावा पर्यंत सुरु करुन दिली.

Web Title: khireshwar work of road repairing complited