Neelam Wagh : खो खो खेळाडू नीलम वाघ बनली राज्य विक्रीकर निरीक्षक अधिकारी

नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य विक्रीकर निरीक्षक पदी (STI) नीलम वाघची निवड झाली.
Neelam Wagh
Neelam Waghsakal

निरगुडसर - रांजणी, ता. आंबेगाव येथील शेतकरी कुटुंबातील खो खो खेळाडू नीलम सूर्यकांत वाघ हीची नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य विक्रीकर निरीक्षक पदी (STI) निवड झाली असून नीलमने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले असून तिने खेळाडू कोट्यातून महिला गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

रांजणी (ता.आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेचे नरसिंह विद्यालय ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स येथील माजी विद्यार्थिनी आणि नरसिंह क्रीडा मंडळाची खो खो खेळाडू आहे. रांजणी येथील शेतकरी कुटुंबातील सूर्यकांत वाघ व रूपाली वाघ यांची नीलम ही कन्या आहे.

नीलमचे प्राथमिक शिक्षण कारमळा येथे तर माध्यमिक शिक्षण नरसिंह विद्यालय रांजणी येथे झाले. नरसिंह विद्यालयाच्या मैदानावर इयत्ता पाचवी पासून तिने खो-खोचे धडे गिरवले. अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करून तिने १९ वर्षीय शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असून राज्य पातळीवर विविध खो खो स्पर्धेत सुवर्ण, रौप्य,कांस्य पदके पटकावली आहेत.

त्यासाठी तिला राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक संदीप चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक राजू तायडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. दहावी व बारावी परीक्षेत विद्यालयात प्रथम मिळवण्याची कामगिरी नीलमने केली होती. महाविद्यालयीन शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे एस एम जोशी महाविद्यालय हडपसर येथे शिक्षणाचे धडे गिरवता गिरवता एमपीएससीचेही धडे गिरविले त्यात तिला यश मिळाले आहे.

नीलमचे वडील सूर्यकांत वाघ व आई रूपाली वाघ या शेती करत असून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात.नीलमला कोमल,मानसी या दोन बहिणी असून तिच्या यशाने परिसरातून तिचे कौतुक होत आहे. मिळालेल्या यशाबद्दल शाळा, ग्रामस्थ व पंचक्रोशीतून नीलमचे अभिनंदन करण्यात आले.

तसेच स्कूल कमिटीचे सदस्य मधुकर हांडे, एकनाथ नाना भोर, बंडेश वाघ, प्राचार्य शिवाजी दुंडे यांनी दिलीपर्यवेक्षक राजेंद्र पडवळ यांनी अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com