MLA Rahul Kul : लोकसभा निवडणुकीत दौंडमध्ये भाजपा महायुतीचा धर्म पाळणार

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दौंड तालुक्यातील भाजपा पक्ष महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
MLA Rahul Kul and kanchan kul
MLA Rahul Kul and kanchan kulsakal

- प्रकाश‌ शेलार

खुटबाव - आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दौंड तालुक्यातील भाजपा पक्ष महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. राहू तालुका दौंड येथे आमदार कुल यांच्या निवासस्थानी आयोजित भाजपा बुथ कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये आगामी खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मतदार संघातील इंदापूर व पुरंदर येथे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसताना आमदार राहुल कुल यांनी मात्र पहिल्या दिवसापासून महायुतीचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतरे व इंदापूर मधील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अगोदर विधानसभेचा शब्द द्या नंतर लोकसभेचे बघू अशी भूमिका घेतली असताना आमदार कुल यांनी सुरुवातीपासूनच घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे राष्ट्रवादीकडून स्वागत होत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे व आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्यामध्ये झालेल्या लढतीची दखल देशपातळीवर घेतली गेली. त्यावेळी कुल यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासोबत होते. तरीसुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत कुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अंतिम मानून कार्यकर्त्यांना महायुतीचे काम आजपासून सुरू करा अशा सूचना दिल्या आहेत.

तसेच आपण स्वतः आगामी १ एप्रिल पासून दौंड तालुक्यातील प्रत्येक गाववाईज कार्यकर्त्यांना भेटीगाठी देण्यासाठी येणार आहोत असे प्रतिपादन कूल यांनी केले आहे.यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी व बूथ समितीच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

या लोकसभा निवडणुकीत बूथ यंत्रणा मजबूत करणे, मतदार याद्या अदयावत करणे, तसेच निवडणूक संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी बूथ प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या बूथवर मतदारांना संपर्क करावा, मोदी सरकारद्वारे करण्यात आलेली विकासकामे घरोघरी पोहोचवावी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांना संपर्क साधावा अशा सूचना करण्यात आल्या.

बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा कांचन कुल, भाजपा तालुका अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, संघटक सरचिटणीस उमेश देवकर, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस शेखर वढाणे, बूथ प्रमुख, गावप्रमुख, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com