अपहरणाच्या गुन्ह्यातील सहा जणांना ‘मोका’

Crime
Crime

पुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली आहे. 

शहाबाज फिरोज खान (वय २८), सुयश राजू वाघमारे (वय २६), अरबाज फिरोज खान (वय २७, रा. तिघेही रा. भवानी पेठ), फरदीन परवेज खान (वय १९), साहिल अब्दुल शेख (वय २३, दोघेही रा. मिठानगर, कोंढवा खुर्द) व सूरज लक्ष्मण चव्हाण (वय २९, रा. वडकी नाला, सासवड रोड) यांच्याविरुद्ध ‘मोका’अंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव खडक पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सादर केला होता. अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी त्याला मंजुरी दिली. या टोळीने भवानी पेठेतील व्यापारी महेंद्र निफजिया (वय ५७) यांचा मुलगा दर्शन (वय २७) याचे ६ ऑक्‍टोबर रोजी अपहरण करून सुमारे २० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. 

खडक पोलिसांनी तत्परतेने हालचाल करून या टोळीतील चौघांना अटक केली, तर शहाबाज आणि सुयश वाघमारे यांना मुंढवा पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. शहाबाज आणि वाघमारे यांना अपहरणाच्या गुन्ह्यातही हस्तांतर करून घेण्यात येणार असल्याचे मोकाशी यांनी सांगितले. सहायक पोलिस आयुक्त प्रदीप आफळे पुढील तपास करीत आहेत. निरीक्षक मोकाशी, विजयकुमार शिंदे, फौजदार राकेश सरडे, पोलिस कर्मचारी महेश बारावकर, महेश कांबळे, दीपक मोघे यांनी याबाबतच्या कारवाईत भाग घेतला.

शहाबाजवर गुन्हे दाखल 
शहाबाजवर या पूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वीही मोकाअंतर्गत कारवाई झाली होती. त्यात न्यायालयाने त्याला सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com