Pune Crime : खंडणीसाठी ज्येष्ठ महिलांचे अपहरण, चार सराईत गुन्हेगारांना अटक

खंडणीसाठी दोन ज्येष्ठ महिलांचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Ransom Crime
Ransom Crimeesakal

पुणे - खंडणीसाठी दोन ज्येष्ठ महिलांचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोन्ही महिलांची सुटका करून सराईत गुन्हेगार बाबूलाल लक्ष्मण मोहोळ आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली.

या प्रकरणी वैभव भास्कर पोखारे (रा. किरकटवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बाबूलाल लक्ष्मण मोहोळ (वय ४५, सरडे बाग, उत्तमनगर), अमर नंदकुमार मोहिते (वय ३९, गणेश नगर, एरंडवणे), प्रदीप प्रभाकर नलावडे, (वय ३८, रा. भूगाव) आणि अक्षय मारूती फड (वय २४, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव यांच्या आई आणि त्यांच्या सहकारी यांचे १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अपहरण करण्यात आले. त्यांच्या सुटकेसाठी आरोपींनी पोखरे यांच्याकडे १७ लाख रुपये खंडणीची मागणी केली होती.

आरोपी बाबूलाल मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार शंकर संपते यांना मिळाली. पोखरे आणि पवार यांनी पुणे स्टेशन येथील स्टॅाल मिळवून दिला नाही. त्यामुळे सहा लाखांचा तोटा झाला असे सांगून मोहोळने महिलांचे अपहरण केले. आरोपींनी पोखरेंच्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन १७ लाख रुपयांची मागणी केली.

खंडणी विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे या गुन्ह्याचा तपास सुरू केला. महिलांना डांबून ठेवलेल्या ठिकाणाचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांची सुखरूप सुटका केली.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, विजय गुरव, शंकर संपते, प्रदीप शितोळे, विनोद साळुंखे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, राहुल उत्तरकर, चेतन आपटे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, आशा कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com