आपली मुलंही बनतील ‘किड्‌स आयडॉल’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

‘सकाळ’तर्फे डान्स व फॅन्सी ड्रेस स्पर्धा; बुधवारपासून ऑडिशन्स सुरू
पुणे - प्रत्येक मुलाला डान्स किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे कुतूहल असतेच. त्यांचे हे कुतूहल त्यांना ‘किड्‌स आयडॉल’ बनवू शकते. याचाच विचार करून ‘सकाळ’ आणि पुणे सेंट्रलतर्फे ‘किड्‌स आयडॉल’ स्पर्धेचे आयोजन केले असून, मुले व पालकांचा याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

‘सकाळ’तर्फे डान्स व फॅन्सी ड्रेस स्पर्धा; बुधवारपासून ऑडिशन्स सुरू
पुणे - प्रत्येक मुलाला डान्स किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे कुतूहल असतेच. त्यांचे हे कुतूहल त्यांना ‘किड्‌स आयडॉल’ बनवू शकते. याचाच विचार करून ‘सकाळ’ आणि पुणे सेंट्रलतर्फे ‘किड्‌स आयडॉल’ स्पर्धेचे आयोजन केले असून, मुले व पालकांचा याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

मुलांची स्टेज डेअरिंग आणि आत्मविश्‍वास वाढावा, यासाठी पालक आग्रही असतात. डान्स आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेमधून मुलांच्या या कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे अशा स्पर्धेला मुलांचा कमालीचा प्रतिसाद लाभतो. यंदा या स्पर्धेची डान्स ऑडिशन्स २१ डिसेंबरपासून सुरू होत आहेत.

डान्स स्पर्धेसाठी तीन गट केले असून, पहिल्या गटात नर्सरी ते तिसरी, दुसऱ्या गटात चौथी ते सहावी आणि तिसऱ्या गटात सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे.

फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी पहिल्या गटात नर्सरी ते पहिली आणि दुसऱ्या गटात दुसरी ते पाचवीचे विद्यार्थी असे दोन गट केले आहेत. यासाठीची नोंदणी कर्वे रस्ता, विद्यापीठ रस्ता आणि पिंपरी येथील पुणे सेंट्रल मॉल व ॲमनोरा पार्क टाउन पुणे सेंट्रल येथे दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत सुरू असेल. ही नोंदणी सोमवार (ता. १९) पर्यंत कस्टमर सर्व्हिस डेस्क काउंटरवर करता येईल.

डान्सच्या ऑडिशन वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी होणार असून, त्यासाठी गाण्याची एमपी३ सीडी आणणे आवश्‍यक आहे. येत्या बुधवारी (ता. २१) पिंपरी येथील पुणे सिटी-पुणे सेंट्रल मॉल, गुरुवारी (ता.२२) कर्वे रस्ता येथील पुणे सेंट्रल मॉल, शुक्रवारी (ता.२३) विद्यापीठ रस्त्यावरील पुणे सेंट्रल मॉलमध्ये, तर शनिवारी (ता. २४) ॲमनोरा मॉल येथील पुणे सेंट्रलमध्ये ही ऑडिशन होणार आहे. २५ डिसेंबर रोजी याच ठिकाणी अंतिम फेरी (डान्स) व फॅन्सी ड्रेस होणार असून, सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि विजेत्यांना आकर्षक बक्षीस मिळणार आहे. डान्स स्पर्धेसाठी आयटम साँग स्वीकारले जाणार नाहीत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य राहील.
संपर्क - ८८०५००९३९५, ९५५२५३३७१३, ९८२२०७८४१५

Web Title: kids idol competition by sakal