पत्नी, सासू-सासऱ्याच्या मारहाणीत पतीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

पिंपरी - शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या पतीचा पत्नी आणि सासू-सासऱ्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. निगडी येथील यमुनानगरमध्ये शनिवारी (ता. 15) रात्री साडेअकराच्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

पेत्रस जॉन मनतोडे (वय 29, रा. स्कीम नं. 11, कौंतेय सोसायटी, यमुनानगर, ओटास्कीम, निगडी) असे मृत पतीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी क्रिस्टिना पेत्रस मनतोडे (वय 28), सासू लुसिया सूर्यकांत बोरडे (वय 55), सासरा सूर्यकांत संतोष बोरडे (वय 58, तिघेही रा. से.21, स्कीम 10, रूम नं. 10, अनुपम सोसायटी, यमुनानगर, निगडी) यांना अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेत्रस आणि क्रिस्टिना यांचा पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. पेत्रस दारूच्या नशेत क्रिस्टिनाला त्रास देत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून ती तीन वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली होती. तरीही तो तिच्या आई-वडिलांच्या घरी येऊन तिला शिवीगाळ आणि मारहाण करत होता. त्याला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. 

दरम्यान, घटनेच्या दिवशी पेत्रस दारू पिऊन इमारतीच्या खालून पत्नी क्रिस्टिना व त्याच्या सासू-सासऱ्याला शिवीगाळ करत होता. त्या वेळी क्रिस्टिना घरामध्ये मुलीसोबत होती. त्याची समजूत काढण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांशी तो वाद घालत असल्याचे पाहून ती इमारतीच्या खाली आली. येताना तिने घरातील लोखंडी पाना आणि लाल मिर्चीची पूड घेऊन आली. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे तिने दरवेळेच्या त्रासाला कंटाळून त्याच्यावर मिर्चीची पूड टाकून लोखंडी पाना डोक्‍यात मारला. आई-वडिलांनी सिमेंटचे ब्लॉक तसेच कपडे धुण्याच्या लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

Web Title: killed husband

टॅग्स