

सर्वांच्या सुखातच सुख मानणारा सज्जन
केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करणारी वृत्ती माणसाला स्वार्थी बनवते; मात्र सर्वांच्या सुखात आपले सुख मानणारा खरा सज्जन असतो. आज प्रत्येकजण स्वतःपुरता विचार करू लागल्याने दया, करुणा आणि माणुसकी कमी होत आहे. इतरांचे दुःख पाहून संवेदनशील होणे आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, हीच खरी सज्जनता आहे. इतरांचे सुख हिरावून कोणीही खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही. दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेले सुख क्षणिक असते; मात्र इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात मिळणारे समाधान खरे असते. त्यामुळे केवळ स्वतःच्या आनंदाचा विचार न करता सर्वांच्या कल्याणाची भावना मनात बाळगावी. ‘सर्व सुखी तर मी सुखी’ हा विचार आचरणात आणून इतरांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखाला महत्त्व देत करुणा, माणुसकी आणि सज्जनतेचा मार्ग स्वीकारावा, असे मुनिश्री प्रशांतरत्न विजयजी यांनी सांगितले.
-----------------------------------
नियम, संयमातून जागते आत्मशक्ती
जीवनात नियम, संयम आणि बंधने असतील तर विवेक जागृत होतो आणि उत्तम कर्म घडतात. जप, तप, उपवास आणि नियम यामुळे मनाची शक्ती वाढून दृढता व मनोबल बळकट होते. नियम जीवनाचा भाग बनल्यास काम, क्रोध, मद, मोह, आशा आणि अपेक्षा शांत होतात. तपश्चर्येमुळे कर्मांचे भोग शरीरापुरते मर्यादित राहतात आणि आत्मशक्ती जागृत होते. रूप, संपत्ती किंवा सिद्धीचा अभिमान न बाळगता नम्र राहावे. स्वतःवर नियंत्रण ठेवणे हीच खरी साधना आहे. आसक्ती हे सर्व दुःखांचे मूळ असून त्यागाची वृत्ती आत्मिक सामर्थ्य वाढवते. त्यामुळे अकार्य टाळून कष्ट, प्रयत्न आणि साधनेच्या मार्गावर राहावे. आत्मशक्ती जागृत असेल तर जीवनातील संकटे आणि साधनेतील अडथळे सहज पार करता येतात. त्यासाठी नियम आणि संयमातून आत्मशक्ती जागवा, असा संदेश परमपूज्य साध्वी अक्षयश्री म.सा. यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.