पुणे : किरणप्रभाजी महाराज यांचे महानिर्वाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

ज्येष्ठ जैन साध्वी किरणप्रभाजी महाराज यांचे शनिवार ता.(१२) दुपारी अहमदनगर येथे महानिर्वाण झाले. त्यांनी जैन धर्मानुसार संथारा व्रत ग्रहण केले होते.

पुणे : ज्येष्ठ जैन साध्वी किरणप्रभाजी महाराज यांचे शनिवार ता.(१२) दुपारी अहमदनगर येथे महानिर्वाण झाले. त्यांनी जैन धर्मानुसार संथारा व्रत ग्रहण केले होते.

साध्वी किरणप्रभाजी महाराज यांच्या पार्थिवावर रविवार (ता.१३) सकाळी अकरा वाजता नगर एस टी स्टँड परिसरातील उज्वलनगर येथे अंतिम संस्कार करण्यात येतील, असे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, अहमदनगर यांच्या वतीने कळवण्यात आले आहे. साध्वीजींच्या अंत्यदर्शनासाठी दुपारपासून भाविकांची रिघ लागली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kiran Prabhaji Maharaj Died at Ahmednagar

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: