esakal | किरीट सोमय्या बुधवारी बारामती दौ-यावर; चर्चांना उधाण I Kirit Somaiya
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit-Somaiya

किरीट सोमय्या बुधवारी बारामती दौ-यावर; चर्चांना उधाण

sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती - भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या बुधवारी (ता. 6) पवारांच्या बारामती दौ-यावर येत आहेत. गेल्या काही दिवसात सोमय्या यांनी विविध राजकीय नेत्यांना ज्या पध्दतीने लक्ष्य केले आहे, ते पाहता बारामतीत ते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी करण्याच्या निमित्ताने सोमय्या बारामतीत येत असले तरी या या निमित्ताने ते कोणावर निशाणा साधणार या बाबत खरी उत्सुकता आहे. बुधवारी साता-याहून सोमय्या कोरेगाव मार्गे जरंडेश्वर कारखान्यावर जाणार आहेत. त्या ठिकाणी शेतक-यांशी ते संवाद साधणार आहेत. त्या नंतर पुसेगावमार्गे डिस्कळ वरुन ते फलटण येथे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाणआर आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्याची आर्थिक फसवणुक करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस अटक

दुपारी पावणेदोन वाजता बारामतीत त्यांचे स्वागत केले जाणार असून खरमाटे यांच्या जागांची पाहणी करुन ते बारामतीच्या भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्या नंतर भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधून संध्याकाळी साडेसहा वाजता ते जेजुरीच्या खंडोबा मंदीरात दर्शन घेऊन सव्वासात वाजता सासवड येथे थांबणार आहेत. रात्री साडे आठ वाजता फुरसुंगी येथे त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

सोमय्यांची जरंडेश्वर कारखान्याला भेट व त्या पाठोपाठ बारामतीत पत्रकार परिषद होत असल्याने ते पवारांच्या बालेकिल्ल्यात येऊन काय बोलतात कोणावर आरोप करतात, या बाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर सोमय्यांच्या स्वागताचा फलकही उभारला आहे.

loading image
go to top