Girish Bapat: किरीट सोमय्यांनी घेतली गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची भेट

भाजपच्या जन संघाची ही शेवटची पिढी होती
Girish Bapat
Girish BapatEsakal

पुण्यातील भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचं काल पुण्यात निधन झालं. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७२ वर्षांचे होते. खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी होते.

दरम्यान भाजप नेते किरीट सोमाय्या आज गिरीश बापट यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी गिरीश बापट यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. भाजपच्या जन संघाची ही शेवटची पिढी होती. गिरीश बापट हाडाचे कार्यकर्ते होते. एका पाठोपाठ एक पिढी जात आहे. नवीन पिढीने गिरीश बापट यांच्याकडून शिकायचे आहे असं सोमाय्या बोलताना म्हणाले.

Girish Bapat
Ajit Pawar: 'अधिवेशनाच्या वेळी 18 दिवस आम्ही तेच सांगत होतो'

राजकीय नेत्यांनी बापट यांच्याकडून आदर्श वादी नेते म्हणून शिकायला हवे. बापट यांनी संघर्ष केला आणि आपलं पुणे देशात पुढे जावे हे नेहमी प्रयत्न करायचे आणि यात मोठे योगदान आहे. काळ पुढे सरकत राहतो. श्याम मुखर्जी यांच्यानंतर जन संघ संपला असं वाटलं होतं पण प्रत्येक पिढी महाराष्ट्राला नवी उंची गाठून देत आहे. बापट यांनी अनेक कार्यकर्ते तयार केले आहेत पुण्याला पुढे घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत असंही सोमाय्या यावेळी बोलताना म्हणाले.

Girish Bapat
Girish Bapat Passed Away : भाजपचा किंगमेकर हरपला! खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com