Pune News : किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन मंगळवारी (ता. ९) पर्यावरण चित्रपट निर्माते व लेखक-दिग्दर्शक जेसन टेलर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.
Kirloskar-vasundhara-film-festival
Kirloskar-vasundhara-film-festivalSakal

पुणे - किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन मंगळवारी (ता. ९) पर्यावरण चित्रपट निर्माते व लेखक-दिग्दर्शक जेसन टेलर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. जेसन टेलर यांनी दिग्दर्शित केलेला ‘नटबार सारंगी’ हा या महोत्सवाचा उद्‍घाटनाचा चित्रपट दाखवण्यात आला.

जेसन टेलर म्हणाले, ‘अन्न सुरक्षेच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आखली जाणारी धोरणे आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावर होत असलेली कामे यात प्रचंड तफावत आहे. आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये बीजोत्पादक कंपन्यांचे हित जपण्याकडे कल दिसून येतो. वेळीच आपल्या बियांचे जतन केले नाही, तर आपण आपली ओळख संपुष्टात आणू.’

महोत्सवाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‍घाटन पर्यावरण कार्यकर्ते, लेखक बिट्टु सहगल यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने झाले. ‘सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ हा या महोत्सवाचा विषय असून शुक्रवारपर्यंत हा महोत्सव सुरू असेल.

यानिमित्त नवी पेठेतील पत्रकार भवनात वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सोलापूर येथील यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्ष अनिता माळगे यांना ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अनिता माळगे, योगेश माळगे, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, ‘केएफआयल, सोलापूर’चे पदाधिकारी दैदिप्य वडापूरकर आदी उपस्थित होते.

अनिता माळगे म्हणाल्या, ‘सोलापूर जिल्ह्यात सहकाराचे जाळे अतिशय चांगले आहे. पारंपरिक वातावरणामुळे महिलांवर बंधने होती. मात्र, आम्ही महिलांनी हिंमतीने आणि चिकाटीने पुढाकार घेऊन यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन करत यशस्वी उद्योजकतेचे उदाहरण प्रस्थापित केले. आमच्या या प्रयत्नांची दखल घेऊनच केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांनी ‘एक जिल्हा एक भरडधान्य’ या धोरणांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील भरडधान्याला ओळख प्राप्त करून दिली.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com