esakal | लोणी भापकर येथे महिलेला अपशब्द वापरल्यामुळे केला चाकूहल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

लोणी भापकर येथे महिलेला अपशब्द वापरल्यामुळे केला चाकूहल्ला

वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी येथिल राजेंद्र पोपट खोमणे याच्यावर  जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या हल्ल्यात तात्या नामदेव मदने हे गंभीर जखमी झाले आहेत.

लोणी भापकर येथे महिलेला अपशब्द वापरल्यामुळे केला चाकूहल्ला

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर - घरातल्या महिलेविषयी अपशब्द वापल्याचा राग अनावर झाल्याने एकावर चाकू हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लोणी भापकर (ता. बारामती) येथे  गुरुवारी  ता. २९ सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी येथिल राजेंद्र पोपट खोमणे याच्यावर  जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या हल्ल्यात तात्या नामदेव मदने हे गंभीर जखमी झाले आहेत. मनोज शंकर मदने यांनी याबाबत फिर्याद दाखल केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादीत नमूद केल्यानुसार फिर्यादी व त्यांचा भाऊ तात्या नामदेव मदने व राजेंद्र खोमणे हे गावातल्या बिअरशाॅपीजवळ गप्पा मारत थांबले असताना नात्यातील महिलेला अपशब्द वापरल्याच्या रागातून खोमणे याने तात्या मदने यांच्यावर चाकूने वार केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके अधिक तपास करत आहेत.

हे वाचा - इंटरनेटच्या मायाजालात गुरफटले जग