कोजागरी पौर्णिमेनिमित्त पुण्यात तरुणाईचा जल्लोष

कोजागरी पौर्णिमेनिमित्त पुण्यात तरुणाईचा जल्लोष

पुणे - कुठे रिमझिम बरसणाऱ्या सरी, तर कुठे शहरभर दाटलेले ढग. त्यात लपलेल्या चंद्राचे दर्शन घडणेही मुश्‍कील झाले. असे वातावरण पाहून पुणेकरांनी रविवारी घरांचे टेरेस, गच्ची, मैदाने, बागांऐवजी  घरातच वाफळलेले दूध घेतले. काही भागांत सार्वजनिक ठिकाणी गप्पांची मैफल रंगवीत कोजागरी पौर्णिमा आनंदोत्साहात साजरी करण्यात आली. तर कोठे तरुणाईने जल्लोष केला.  विविध गाण्यांवर थिरकत सुगंधी दुधाचा  आस्वाद त्यांनी घेतला. 

मागील काही दिवसांपासून पुणेकरांना हैराण करून सोडणाऱ्या पावसाने कोजागरी पौर्णिमेलाही व्यत्यय आणला. रविवारी सायंकाळी शहराच्या अनेक  भागांत पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. 

सार्वजनिक उद्यानामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात नागरिक कोजागरी पौर्णिमा साजरी करतात, त्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील सुमारे ३१ उद्याने रात्री बारापर्यंत खुली ठेवली होती. मात्र, सायंकाळी शहराच्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. रात्री  उशिरा चंद्रदर्शनानंतर तेथे  गर्दी उसळली.

रात्री उशिरा झाले चंद्रदर्शन
बहुतांश उद्यानांमध्ये नागरिकांची संख्या नंतर वाढली. त्यातच ढगाळ वातावरणामुळे रात्री उशिरा चंद्राचे दर्शन झाले. परिणामी काही नागरिकांनी चंद्राविना, तर काहींनी रात्री उशिरा चंद्र दिसल्यानंतर कोजागरी साजरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com