

Pune Police Recruitment Scam Probe Couple From Kolhapur Arrested Over Alleged Fake Kurash Sports Certificate
sakal
पुणे: शहर पोलिस दलाच्या शिपाई भरती प्रक्रियेत कुराश या खेळाचे बनावट प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविल्या प्रकरणात कोल्हापूरमधील एका दांपत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. हे जोडपे महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे सचिव शिवाजी साळुंखे यांचे नातेवाईक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.