पुणे अन् कोल्हापुरमधील अपघातग्रस्त बसचा क्रमांक एकच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

सुमारे साडेपाच वर्षांपूर्वी 25 जानेवारी 2012 ला पुण्यात संतोष माने या माथेफिरू चालकाने एसटी डेपोतून बस पळवून नेऊन ती रस्त्यावरून बेदरकारपणे पळवली होती. त्यात त्याने अनेकांना चिरडले होते. जी बस त्याने पळवली होती त्या बसचा क्रमांक (एमएच 14 बीटी 1532) हा होता.

पुणे - एमएच 14 बीटी 1532 हा क्रमांक आहे पुण्यात साडेपाच वर्षांपूर्वी बेदरकारपणे बस चालवून नागरिकांना चिडणाऱ्या एसटी बसचा आणि बुधवारी कोल्हापुरात चालकाला भोवळ येथून बसवरील नियंत्रण सुटल्याने दोन चिरडले गेल्याच्या बसचा क्रमांकही हाच असल्याचे समोर आले आहे.

सुमारे साडेपाच वर्षांपूर्वी 25 जानेवारी 2012 ला पुण्यात संतोष माने या माथेफिरू चालकाने एसटी डेपोतून बस पळवून नेऊन ती रस्त्यावरून बेदरकारपणे पळवली होती. त्यात त्याने अनेकांना चिरडले होते. जी बस त्याने पळवली होती त्या बसचा क्रमांक (एमएच 14 बीटी 1532) हा होता. त्याच प्रकारे बुधवारी कोल्हापुरातही दुर्घटना घडली; मात्र यामध्ये बसच्या चालकाला भोवळ आल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने काही गाड्या उडवल्या तर काहींना चिरडले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघातातील बसचा क्रमांक एमएच 14 बीटी 1532 हाच आहे. 

यावरून पुण्यातील तीच बस असल्याचे स्पष्ट होत आहे. या दोन्ही बसची छायाचित्रे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 25 जानेवारी 2012 ला पुण्यात मानेने बेदरकारपणे एसटी चालवली होती. त्यामध्ये नऊ जण ठार झाले तर 35 जण गंभीर जखमी झाले होते. आज झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर 9 जण जखमी झाले आहेत. कोल्हापुरातील एसटी अपघातातील आणि पुण्यामध्ये संतोष मानेने बेदरकारपणे चालवलेली बस एकच असल्याचे नंबरप्लेटवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या दुर्दैवी योगायोगाची सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

Web Title: Kolhapur News same number of accidental buses in Pune and Kolhapur