बारामती तालुक्यातील हा तलाव ५० वर्षानंतर पहिल्यांदा भरला; पहा कोणता ते

कोळोली (ता. बारामती) - ५० वर्षानंतर प्रथमच तलाव भरल्याने मान्यवरांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.
कोळोली (ता. बारामती) - ५० वर्षानंतर प्रथमच तलाव भरल्याने मान्यवरांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.

सुपे - सतत दुष्काळी भाग, पुरेसा पाऊस पडणे म्हणजे भाग्यच. त्यात खरीप हंगामात तर केवळ ढगांकडेच पाहावे लागायचे. अशा स्थितीत बारामती तालुक्यातील कोळोली गावात शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे सुमारे ५० वर्षानंतर देसाई तलावातील पाणी सांडव्यातून बाहेर पडले. एका बाजुला पिकांची नासाडी झाली असतानाही गावकऱ्यांनी तलाव भरल्याच्या आनंदाने जलपुजन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोळोलीचा देसाई तलाव सन १९७० मध्ये कासा योजनेतून बांधला. या तलावाचे भुमिपुजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यावेळी प्रथमच आमदार म्हणून निवडून आले होते, त्यांच्या हस्ते करण्यात आल्याची आठवण येथील ज्येष्ठ कार्यकर्ते संपतराव काटे यांनी सांगितली. या तलावात अद्याप एवढा मोठा पाणीसाठा झाला नव्हता. आज प्रथमच सांडव्यातून पाणी वाहताना पाहून ग्रामस्थ सुखावले होते. 

गावातील सहा तलाव तुडूंब भरले असून, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हॉर्यलमेंट फोरम ऑफ इंडियाने खोलीकरण व रूंदीकरण केलेल्या ओढ्यातून पाणी वहात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पावसाने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तलाव क्षेत्रात देसाई, काटे, खेत्रे, जगताप, लांडगे आदी कुटुंबाची मिळून सुमारे १०० एकर जमिन पाण्याखाली गेली आहे. या जमिनीचा मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.    

तलावाच्या भराव दुरूस्ती व खोलीकरणाचे काम जिल्हा परिषदेच्या निधीतून करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य भरत खैरे यांनी दिली. या तलावातील पाण्याचे जलपुजन श्री. खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक योगेश बळगट, जयेश भद्रा, सरपंच पल्लवी खेत्रे, उपसरपंच सतीश काकडे, सदस्य राहुल गोसावी, जयश्री खेत्रे, प्रतिक्षा काटे, रोहिणी खेत्रे, शकुंतला सकट, वसंतराव काटे, गंगाराम खेत्रे, मधुकर काटे, प्रमोद खेत्रे, शिवाजी खेत्रे, प्रल्हाद काकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com