Pune Crime : धारदार शस्त्र दाखवत बोपदेव घाटात लुटले; पाच तासात पोलिसांची आवळल्या मुसक्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime News

धारदार शस्त्र दाखवत बोपदेव घाटात लुटले

कॅन्टोन्मेंट : बोपदेव घाटात धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून लुटणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पाच तासात पर्दापाश केला. दोघांना अटक करून चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.आदित्य रवी माने (वय १८, रा. पापळवस्ती, बिबवेनगर, बिबवेवाडी, पुणे), अशोक माणिक काळे (वय १८, रा. गणपतनगर, पापळवस्ती, बिबवेवाडी, पुणे) या दोघांना अटक केली असून, चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले

पोलिसांनी सांगितले की, विक्रांत गुरुदेव गारगोटे (वय २७, रा. आनंद सोसायटी, पाटील इस्टेट, वाडा रोड, राजगुरूनगर, पुणे) हा निखील निवृत्ती सातारकर या मित्राबरोबर गप्पा मारत बोपदेव घाटात थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार-पाच जणांनी धारदार कोयत्याचा धाक दाखवत तूच विकी मोरे आहे का असे विचारून कोयता उगारून लुटले होते. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत तक्रार दाखल होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी मोटारसायकलसह कात्रज येथील एस.आर.ए. सोसायटीच्या खाली थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी तत्पर पाठलाग करून आरोपींना पकडून अटक करून चार विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

हेही वाचा: पूर्वांचल एक्सप्रेसवेवर PM मोदी विमानातून दाखल; पार पडलं उद्घाटन

कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलीसन निरीक्षक गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार रमेश गरुड, पोलीस नाईक सतीष चव्हाण, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, तुषार आल्हाट, किशोर वळे, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

loading image
go to top